मिआमी
मिआमी : अमेरिकेच्या फ्लॉरिडा राज्यातील डेड परगण्याचे मुख्य ठिकाण, बंदर आणि जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ. लोकसंख्या ३,८२,७२६ (१९८२ अंदाज), महानगर १६,२५,७८१ (१९८०). अटलांटिक महासागरापासून ५·६ किमी. वर बिस्केन उपसागराला मिळणाऱ्या मिआमी नदीच्या मुखाशी हे वसलेले आहे.